मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू
मागासवर्गीय मुलांच्या शासकीय
वसतिगृहात प्रवेश सुरू
अकोला, दि. 15 : अकोला, तसेच
बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय
वसतिगृहात विनामूल्य प्रवेश देणे सुरू आहे.
वसतिगृहामध्ये राहण्याची, भोजनाची, मोफत सुविधा, तसेच स्टेशनरी भत्ता,
गणवेश भत्ता व मासिक निर्वाह भत्ता मिळतो. वसतिगृहात ई- लायब्ररी, ध्यान साधना केंद्र,
गरम पाणी, वॉटर फिल्टर पाणी आदी सुविधा पुरविण्यात येतात.
प्रवेश अर्ज लवकरात लवकर भरावा. त्यासोबत शाळा सोडल्याचा दाखला, चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला,
आधारकार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक, गुणपत्रिका,
रहिवाशी दाखला आदी कागदपत्रे सादर करावी. बार्शिटाकळी व अकोला येथील वसतीगृहात
वर्ग 8 वी ते पदवीपर्यंत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना टक्केवारीनुसार विनामूल्य प्रवेश देण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी मो.नं.8308058833 वर संपर्क साधावा
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा