नवोदय विद्यालयातील दोन विद्यार्थ्याची फेलोशिपसाठी निवड

 

 नवोदय विद्यालयातील दोन विद्यार्थ्याची फेलोशिपसाठी निवड

अकोला, दि. 9 : येथील पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या वरद खटे व संघर्ष खंडारे या इयत्ता नववीच्या दोन विद्यार्थ्यांची फ्लेम युनिव्हर्सिटीच्या फेलोशिप कार्यक्रमात निवड झाली आहे.

युनिव्हर्सिटीतर्फे ‘सेंटर फॉर नॉलेज अल्टरनेटिव्हज’ जिल्हा फेलाशिप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारे संपूर्ण देशातील जिल्हास्तरीय आकडेवारी आणि संस्कृती आदी बाबींचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात प्रकल्पाची सुरूवात होत आहे. या विद्यापीठामार्फत महाराष्ट्रातील एकूण 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.  

कार्यक्रमानुसार डिस्ट्रिक्ट फेलो हे जिल्ह्यातील प्रमुख सांस्कृतिक पैलूंच्या दस्तऐवजीकरणासाठी संशोधन करतील. स्थानिकांशी संवाद, विविध स्थळांना भेट आदींद्वारे महत्वाची माहिती गोळा केली जाईल.   सर्वेक्षण, त्यासाठी उपयुक्त साधनांचा विकास, लेखन आणि प्रभावी संज्ञापन, सामाजिक शास्त्रांच्या अनुषंगाने आवश्यक माहिती अशा विविध बाबींचे प्रशिक्षण फेलोंना दिले जाईल. 

फेलोशिपसाठी प्राचार्य आर.एस.चंदनशिव, शिक्षक शाम काटोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम