जात पडताळणी अर्जातील त्रुटी दूर करून घ्याव्यात - समितीचे आवाहन
जात पडताळणी अर्जातील त्रुटी दूर करून घ्याव्यात
-
समितीचे आवाहन
अकोला, दि. 27 : जात वैधता प्रमाणपत्रासाठी 2023-24 या वर्षात अर्ज
करणा-या व्यक्तींना त्रुटीबाबत ई-मेल व एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. त्रुटी दूर
करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मोहिम हाती घेण्यात आली असून,
संबंधितांनी दि. 31 मेपूर्वी त्रुटींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन समितीतर्फे
करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक किंवा इतर अभ्यासक्रमासाठी
प्रमाणपत्राची आवश्यकता असेल त्यांनी तत्काळ अर्ज सादर करावे जेणेकरून त्यांना प्रमाणपत्र विहित मुदतीत मिळेल, असे आवाहन
समितीचे अध्यक्ष शरद कुलकर्णी, सदस्य अमोल यावलीकर, पी. डी. सुसतकर यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा