जवाहर नवोदय विद्यालयाची परंपरा कायम; सर्व विद्यार्थी उत्तीर्ण

 

जवाहर नवोदय विद्यालयाची परंपरा कायम; सर्व विद्यार्थी उत्तीर्ण

अकोला, दि. 16 :  दहावी व बारावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दहावीत गायत्री लांडे, मृदुला ठोंबरे व प्राची वाधवानी या विद्यार्थीनी अनुक्रमे 99, 98 व 96.8 टक्के गुण मिळवून अव्वल ठरल्या. बारावी विज्ञान शाखेत वैष्णवी राऊत हिने 91.50, यश ठाकरे याने 90 व ज्ञानेश्वरी खोत हिने 87.33 टक्के गुण मिळवले. 12 वी वाणिज्य शाखेत सोहम भडांगे याला 89.17 व ऋषिकेश कांबळे याला 88.83 टक्के गुण मिळाले. बारावी विज्ञान शाखेतील 28, वाणिज्य शाखेतील 33 आणि दहावीतील 79 असे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम