जिल्ह्यात नाविन्यपूर्ण पीकांचे क्षेत्र वाढवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार
जिल्ह्यात नाविन्यपूर्ण पीकांचे क्षेत्र
वाढवा
-
जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि.
9 : मसालावर्गीय, तेलवर्गीय व नाविन्यपूर्ण पिकांचे मूल्यवर्धन
केल्यास पारंपरिक पिकांच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे अशा पीकांचे
जिल्ह्यात क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद
करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे सांगितले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या
(आत्मा) नियामक मंडळाच्या नियोजनभवनात आयोजित सभेत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी
अधिकारी बी. वैष्णवी, प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉ.प्रकाश घाटोळ, डॉ. उमेश ठाकरे, डॉ. चैतन्य
पावशे, ‘नाबार्ड’चे
जिल्हा व्यवस्थापक श्रीराम वाघमारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्री. कुंभार म्हणाले की, कृषी वसंत अभियानात पिकांचे वैविध्यीकरण होणे आवश्यक
आहे. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन जिरे, ओवा, सोप, हळद, करडई व मोहरी आदी मसालावर्गीय व तेलवर्गीय पिकांच्या क्षेत्र वाढीसाठी नियोजन व्हावे. अतिघनता
लागवड पद्धतीने आंबा लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकरी बांधवांनाही नाविन्यपूर्ण
पिकांकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांसाठी कृषी प्रात्यक्षिके, शेतीशाळा, शेतकरी
अभ्यास दौरे, तसेच
शेतकरी प्रशिक्षणे आदींचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा