जात पडताळणी कागदपत्रे पूर्तता करा - समितीचे आवाहन

जात पडताळणी कागदपत्रे पूर्तता करा - समितीचे आवाहन

अकोला द‍ि. 25 : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाच्यावतीने सन 2023 – 24 या वर्षात जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरीता ज्या अर्जदारांनी अकोला समिती कार्यालयात अर्ज सादर केल आहेत व त्यामध्ये तपासणीनंतर त्रुटी आढळून आल्या आहेत. अशा त्रुटीत आलेल्या प्रकरणाची त्रुटी पुर्ततेकरीता विशेष केलेल्या ईमेल व एसएमएस द्वारे सर्व अर्जदारांनी या कालावधीत योग्य ते कागदपत्रासह समिती कार्यालयात येऊन दि. 31 मे पुर्वी त्रुटी पुर्तता करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असेल अशा विद्यार्थ्यांनी संबंधीत समिती कार्यालयात तात्काळ अर्ज सादर करावे जेणेकरून समिती कार्यालयाला विहीत मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करता येईल. असे अध्यक्ष शरद कुलकर्णी, उपायुक्त तथा सदस्य अमोल यावलीकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव पी.डी. सुसतकर यांनी कळविले आहे.

000000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम