जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्रदिन साजरा





 

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्रदिन साजरा

अकोला, दि. 1 : महाराष्ट्रदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

 

यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत व राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणा-या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सर्व अधिकारी व कर्मचा-यांना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, माहितीविज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी, समन्वय अधिकारी गजानन महल्ले आदी यावेळी उपस्थित होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम