शासकीय मुकबधीर विद्यालयात प्रवेश देणे सुरू
शासकीय मुकबधीर विद्यालयात प्रवेश देणे सुरू
अकोला, दि. 9 : शासकीय मुकबधीर विद्यालयात मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी
इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्रवेश सुरू आहेत.
प्रवेशासाठी 6 ते 16 वर्षे
या वयोगटातील मूकबधीर विद्यार्थी पात्र आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अपंगत्वाचे
40 टक्क्यांवरील प्रमाणपत्र आवश्यक. एकापेक्षा जास्त अपंगत्व नसावे. विद्यार्थी हा
महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
संस्थेत विद्यार्थ्यांना विनामुल्य प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांसाठी
निवासाची, भोजन, अंथरुण- पांघरुण, तसेच शालेय स्टेशनरी सुविधा पुरविल्या जातील.
प्रवेश अर्ज शासकीय मूकबधीर विद्यालय, मलकापुर, अकोला येथे विनामुल्य
उपलब्ध आहे. अर्ज दि. 30 जुलैपूर्वी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी समाजकल्याण विभाग
(अपंग शाखा), जिल्हा परिषद, अकोला व शासकीय मूकबधीर विद्यालयाशी संपर्क साधावा.
ही संस्था मलकापूर येथील महसूल कॉलनीत सिद्धेश्वर मंदिरासमोर आहे. भ्रमणध्वनी
क्र. ८०८७१६७९७२ व ९०२८३९५४४१ ९८५०७७९२६० वरही
संपर्क करता येईल.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा