तंबाखू दुष्परिणामांविषयी जनजागृतीसाठी चित्रकला व रील स्पर्धा

 

तंबाखू दुष्परिणामांविषयी जनजागृतीसाठी चित्रकला व रील स्पर्धा

अकोला दि. 16 : जागतिक तंबाखूविरोधी दिनासाठी यंदा जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखु उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण’ही थीम निश्चित केली आहे.  त्यानुषंगाने  जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातर्फे 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व व्हिडीओ रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी ड्राईंगशीटवर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या दुष्परिणामाबद्दल जनजागृतीपर संदेश व ‘तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण’ या विषयावर चित्र तयार करून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात दि. 27 मे रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत प्रत्यक्ष सादर करावे. सोबत नाव, पत्ता व मोबाईल नंबर आदी माहिती जोडावी.

     तंबाखू दुष्परिणामाबद्दल जनजागृतीपर व तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण या विषयावर 180 सेकंदाच्या मर्यादेत व्हिडीओ रील तयार करुन ntcpakola@gmail.com या मेल आयडी किंवा मो. नं. 8308170967 या व्हाटस्अप क्रमांकावर नाव, पत्ता व मोबाईल नंबरसह दि. 27 मे रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत पाठवावे. या स्पर्धेतील प्रथम तीन गुणवंतांना सन्मानचिन्ह व सर्व सहभाग घेणाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम