मतदार नोंदणीसाठी २८ व २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे

 

 

मतदार नोंदणीसाठी

२८ व २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे

अकोला, दि. २३ : विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार  श्रेणीतील मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविणे सुलभ व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार, दि. २८ नोव्हेंबर आणि रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

तरी संबंधित नागरिकांनी शिबिरांद्वारे नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यासंदर्भात सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. मोहिमेत दि. १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रपत्रांचे वितरण व संकलन केले जाईल. संकलित झालेली प्रपत्रे दि. १० डिसेंबर २०२६ पर्यंत निकाली काढण्यात येतील. दावे व हरकती निपटारा दि. १५ डिसेंबर २०२६ पर्यंत दावे आणि हरकतींवर निर्णय घेतला जाईल. अंतिम मतदार यादी दि. २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.  

या विशेष शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आले आहे.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा