राष्ट्रीय कार्यात तरूणांचा सहभाग वाढावा - जिल्हाधिकारी वर्षा मीना

 

विकसित भारत  संवाद- युवक संसद







राष्ट्रीय कार्यात तरूणांचा सहभाग वाढावा

-        जिल्हाधिकारी वर्षा मीना

अकोला, दि १७ : तरुणांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागृती, विधायक राष्ट्रीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे आवश्यक असून, त्यासाठी विकसित भारत युवा संसद उपक्रम महत्वपूर्ण आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.

अकोल्यातील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात माझा भारत युवक केंद्राच्या वतीने आयोजित 'विकसित भारत युवा संवाद' युवा संसद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्राचार्य डॉ. प्रशांत थोरात, केंद्राचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अक्षय निपाणे, प्रा. ज्योती शेगोकार, प्रा. विजय ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच विविध कला, कौशल्ये आणि अंगभूत गुणांची जोपासना आवश्यक आहे. अडचणींवर मात करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने मार्गक्रमण करत राहणे हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात सहभागी युवकांनी 'नशामुक्त भारत' या संकल्पनेवर आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांसह प्राध्यापकवृंद, कर्मचारी उपस्थित होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा