डिजीटल हयात दाखल्याबाबत ‘पेन्शनर्स’साठी सोमवारी मार्गदर्शन
डिजीटल हयात दाखल्याबाबत ‘पेन्शनर्स’साठी सोमवारी मार्गदर्शन
अकोला, दि. २० : निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला डिजीटल
स्वरूपात सादर करण्यात अडचणी येत असल्यास त्यांनी सोमवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी ११
वा. जिल्हधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले
आहे.
निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला डिजीटल
स्वरूपात दाखल करण्याचे आवाहन जिल्हा कोषागाराने यापूर्वीच केले आहे. त्यानुसार अनेकांकडून
डिजीटल दाखले सादर करण्यात आले. तथापि, काही व्यक्तींना दाखला फिजीकला सादर न करता
डिजीटल स्वरूपात सादर करण्यात अडचणी येत असतील तर अशा व्यक्तींसाठी सोमवारी मार्गदर्शन
करण्यात येईल. संबंधित निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीधारकांनी निवृत्तीवेतनाचे बँक
पासबुक, आधारपत्र, तसेच निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक घेऊन उपस्थित राहावे, असे
आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधवराव झुंजारे यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा