अन्नप्रक्रिया उद्योगाबाबत इच्छूकांसाठी प्रशिक्षण
अन्नप्रक्रिया उद्योगाबाबत इच्छूकांसाठी प्रशिक्षण
अकोला, दि. १२ : अकोल्यात अन्नप्रक्रिया उद्योग विकासाच्या अनेक शक्यता
आहे. ते लक्षात घेऊन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे (एमसीईडी) महत्वपूर्ण
‘फोस्टेक’ प्रशिक्षण मंगळवारी (१७ नोव्हेंबर) होणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषकभवनात मंगळवारी सकाळी ११.३०
ते ४.३० वा. दरम्यान हे प्रशिक्षण होईल. अन्नप्रक्रियेशी संबंधित विविध कायदे, सुरक्षित
आवरण, वितरण, हाताळणी व नियोजन, स्वच्छता, अन्न सुरक्षेतील संभाव्य धोके, तसेच कर्ज
व अनुदान योजनांची माहिती प्रशिक्षणातून मिळेल. अन्न प्रक्रिया उद्योगात येऊ इच्छिणा-या
इच्छूक व नवउद्योजकांसाठी हे उपयुक्त प्रशिक्षण असून, इच्छूकांनी केंद्राचे कार्यालय,
जिल्हा उद्योग केंद्र, शुक्ल सदन, दुर्गा चौक, अकोला येथे १६ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी
करावी, असे आवाहन चेतन टिपरे व प्रसन्न रत्नपारखी यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा