‘तीस वर्षांचा पल्ला – तपासणी अन् सल्ला’
‘तीस वर्षांचा पल्ला – तपासणी
अन् सल्ला’
असंसर्गजन्य आजारांच्या निदान-उपचारांसाठी
१०० दिवसांची विशेष मोहीम
अकोला, दि. ५ : सार्वजनिक
आरोग्य विभागातर्फे अकोला जिल्ह्यात ‘तीस वर्षांचा पल्ला – तपासणी
अन् सल्ला’ हे १०० दिवसांचे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. ‘माझं गाव आरोग्य
संपन्न गाव अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा कालावधी १ सप्टेंबर
ते १० डिसेंबर असा आहे.
या अभियानांतर्गत ३० वर्षे व
त्यावरील महिला व पुरुषांची उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशय मुखाचा
कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे.
आजारांचे लवकर निदान, उपचार, संदर्भ
सेवा आणि पाठपुरावा सुनिश्चित करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
अभियानाच्या माध्यमातून ३० वर्षे
व त्यावरील प्रत्येक नागरिकाची तपासणी सुनिश्चित करणे, यापूर्वी तपासणी न झालेल्या व्यक्तींची लाईन लिस्टिंग व
नोंदणी करणे, मधुमेह व उच्च रक्तदाबाचे लवकर निदान करणे तसेच
तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग यांची प्राथमिक
तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान संशयित आढळणाऱ्या रुग्णांना पुढील तपासणी
व उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार असून, तपासणीपासून
निदान, उपचार व पाठपुराव्यापर्यंतची माहिती पोर्टलवर
अद्ययावत करण्यात येणार आहे.
अभियानाच्या सहाव्या टप्प्यात तालुका
व जिल्हास्तरीय तपासणी होत असून, सातवा टप्पा तृतीय
स्तरावरील आरोग्यसेवा १० नोव्हेंबर ते १० डिसेंबर असा असेल
अभियानाची प्रभावी अंमलबजावणी
करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून
कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
‘वेळीच तपासणी, वेळीच निदान आणि योग्य उपचार’ या माध्यमातून अनेक गंभीर
आजारांमुळे होणारी पुढील गुंतागुंत टाळणे शक्य आहे.
या अभियानाचा एक भाग म्हणून मौजे मंचनपूर येथे ईसीजी तपासणीत गुंतागुंत आढळून आलेले रुग्णांना जिल्हा स्तरावर पुढील उपचाराकरिता
पाठवताना आरोग्य कर्मचारी, रुग्ण, नातेवाईक,
उर्वरित सर्व ३० वर्षे व त्यावरील सर्व महिला
व पुरुषांनी आरोग्य तपासणी अवश्य करून
घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
०००
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा