पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करणे अधिक सुलभ ; सुविधेचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी वर्षा मीना

 पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करणे अधिक सुलभ ; सुविधेचा लाभ घ्यावा

 जिल्हाधिकारी वर्षा मीना
अकोला दि. १८: राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांनी तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी सादर करावयाचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र यंदा ऑनलाइन स्वरूपात सादर करता येणार आहे. ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान ५’ अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेचा लाभ घेऊन ३० नोव्हेंबरपर्यंत डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.
 
कोषागारातर्फे निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ‘जीवन प्रमाण’ आणि ‘फेस आरडी ॲप’च्या माध्यमातून चेहरा प्रमाणीकरणाद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या डिजिटल सुविधेमुळे निवृत्तीवेतनधारकांना बँकेत प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रांच्या स्वरूपात प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या अभियानाचा लाभ घेऊन विहित मुदतीत डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधवराव झुंजारे यांनीही केले आहे.

डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करताना काही अडचण आल्यास तालुकास्तरावरील संबंधित उपकोषागार कार्यालयाशी किंवा जिल्हास्तरावरील जिल्हा कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा.असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा