अंमली पदार्थांच्या विक्री व तस्करीविरोधात कडक कारवाई करा- जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक एनडीपीएस कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी
अंमली पदार्थांच्या विक्री व तस्करीविरोधात कडक
कारवाई करा
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक
एनडीपीएस कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी
अकोला, दि. १८ : अंमली पदार्थांची विक्री, तस्करी, उत्पादन, साठवणूक व वाहतूक
करणाऱ्यांविरुद्ध प्रभावी मोहिम राबवून कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक
अर्चित चांडक यांनी आज दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील विजय सभागृहात अंमली पदार्थ विरोधी (नशामुक्ती)
संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. रेल्वे पोलीस, आरोग्य, प्रादेशिक परिवहन, समाजकल्याण
यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी यावेळी
उपस्थित होते. बैठकीत अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक
उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
श्री. चांडक म्हणाले की, अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, १९८५
(NDPS Act) हा भारतातील अंमली पदार्थांचे उत्पादन, लागवड, ताबा, विक्री, खरेदी, वाहतूक,
साठवणूक आणि सेवन यावर नियंत्रण व प्रतिबंध घालणारा मुख्य कायदा आहे. या कायद्याची
प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करावी, असे निर्देश त्यांनी दिले. अंमली पदार्थांची विक्री
व तस्करी करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू
असून या अंतर्गत १९५ प्रकरणातून कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले की, गृह व प्रादेशिक परिवहन विभागांनी जिल्ह्यातील सर्व वाहतूकीच्या
लक्झरी बसेस, चारचाकी वाहने, ऑटोरिक्शा आदी वाहनांची तसेच शाळा, महाविद्यालये तसेच पानटपऱ्यांच्या परिसरात
पोलिसांच्या विशेष पथकांमार्फत नियमित तपासणी व कारवाई करावी. अंमली पदार्थांचे उत्पादन,
साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्या तस्करांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे
निर्देश त्यांनी दिले. तसेच शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील अंमली पदार्थांच्या
विक्रीला आळा घालण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करावे.
शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात पानटपरी तसेच गुटखा व अन्य तंबाखूजन्य
पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध करण्याच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही
बैठकीत सूचना देण्यात आल्या. अंमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभागासोबतच
शैक्षणिक संस्था, पालक, विद्यार्थी आणि नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन
श्री. चांडक यांनी यावेळी केले.

.jpeg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा