युआयडीएआय’चा उपक्रम अकोल्यात सातही दिवस चालणारे आधार सेवा केंद्र सुरू
युआयडीएआय’चा उपक्रम
अकोल्यात सातही दिवस चालणारे आधार सेवा केंद्र सुरू
अकोला, दि. १६ : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयातर्फे नवीन आधार सेवा केंद्राचे उद्घाटन अकोल्यात निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्या हस्ते आज झाले. “अकोला येथील हे आधुनिक आधार सेवा केंद्र आपल्या नागरिकांसाठी जलद, अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा सुनिश्चित करेल. 'डिजिटल इंडिया'चे स्वप्न साकार करण्याच्या आणि आपला राष्ट्रीय विस्तार वाढवण्याच्या दिशेने हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे प्रतिपादन श्री. मालठाणे यांनी यावेळी केले.
आधार सेवा केंद्र व्यवस्थापक रवी पवार आणि युआयडीएआय प्रादेशिक एएम मनोज गुप्ता यांच्यासह सेवा पुरवठादार संस्था प्रोटीयन ई-गव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
हे आधार सेवा केंद्र, ग्राउंड फ्लोअर , रुद्रराज फिटनेस सेंटर जवळ, सर्वे नं 10, रिंगरोड, केशव नगर चौक, अकोला, महाराष्ट्र - ४४४००४ येथे स्थित असून, आठवड्याचे ७ दिवस सुरू राहील. येथे नावनोंदणी, ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट्स, जनसांख्यिकीय सुधारणा आणि जागेवरच तक्रार निवारण यांसारख्या सेवा उपलब्ध असतील.
हे केंद्र आधुनिक सुविधा, व्हीलचेअर प्रवेश, सुलभ स्वच्छतागृह आणि अखंड सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी एका समर्पित आधार सेवा केंद्र व्यवस्थापकाने सुसज्ज आहे. नागरिक युआयडीएआय अपॉइंटमेंट पोर्टल https://bookappointment.uidai.
पुढील पिढीची डिजिटल ओळख सुरक्षित करण्यासाठी शाळांमध्ये विशेष बायोमेट्रिक अपडेट शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
समान सेवा मानके, मजबूत डेटा सुरक्षा आणि वेळेवर तक्रार निवारण सुनिश्चित करण्यासाठी सर्व आधार सेवा केंद्रे युआयडीएआयद्वारे त्यांच्या भागीदार संस्थेच्या माध्यमातून थेट चालवली जातात. प्रत्येक नागरिकाला एक विश्वासार्ह डिजिटल ओळख प्रदान करण्याची आपली बांधिलकी युआयडीएआय याद्वारे पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे.
०००





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा