व्हीबी-जीराम जीअंतर्गत आढावा रोहयोमध्ये अधिकाधिक कामांना चालना द्यावी - जिल्हाधिकारी वर्षा मीना
व्हीबी-जीराम जीअंतर्गत आढावा
रोहयोमध्ये अधिकाधिक कामांना
चालना द्यावी
-
जिल्हाधिकारी
वर्षा मीना
अकोला, दि. २ : जिल्ह्यातील प्रत्येक
गावात व्हीबी-जीराम जी योजनेत कामांना चालना द्यावी जेणेकरून स्थानिक स्तरावर रोजगार
उपलब्ध होईल, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.
दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने
जिल्हाधिका-यांनी रोजगार हमी योजनेतील तालुकानिहाय मजूरांची उपस्थितीचा व कामांचा आढावा
बैठकीद्वारे घेतला. रोहयो उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, वनाधिकारी,
कृषी अधिकारी हे सभागृहात व सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व्हीसीद्वारे उपस्थित होते.
जिल्ह्यात आजमितीला व्हीबी-जीराम
जी योजनेत २ हजार ३४२ कामे सुरू असून, ९ हजार १२५ मजूर उपस्थिती आहे. दुष्काळाच्या
पार्श्वभूमीवर गावांची गरज ओळखून अधिकाधिक कामे प्रस्तावित करावी व त्यांना तत्काळ
चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
शेतात किंवा मोकळ्या जागेवर उताराच्या ठिकाणी
पाणी जमिनीत खोलवर मुरवण्यासाठी जलतारा योजनेतून शोषखड्डे केले जातात. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान ५० जलतारा निर्माण करण्याचे
निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
या माध्यमातून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर
पशुधनासाठी गावोगाव चारा लागवडीला प्रोत्साहन द्यावे. त्याचप्रमाणे, नाला खोलीकरण,
सिंचन विहीरी, वन विभागाच्या माध्यमातून गॅबियन बंधारे, घरकुल, मातोश्री पांदणरस्ते
अशा कामांना चालना द्यावी. मृद व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन कामे सुरू करावी.
ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी
दिले.
०००
.jpeg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा