पेन्शनर्सना हयातीचा दाखला सादर करणे अधिक सुलभ; वित्त विभागातर्फे डिजीटल सुविधा
पेन्शनर्सना हयातीचा दाखला सादर करणे अधिक सुलभ; वित्त विभागातर्फे
डिजीटल सुविधा
निवृत्तीवेतनधारकांनी डिजीटल हयात प्रमाणपत्र सादर करावे
-
जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे
अकोला, दि. ६ : राज्य
शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांनी तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी दि. ३० नोव्हेंबरपर्यंत वार्षिक डिजिटल लाइफ सर्टिफिकेट
(हयातीचा दाखला) सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार
अधिकारी माधव ब. झुंजारे यांनी केले आहे.
कोषागार कार्यालयामार्फत दरवर्षी
निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्याबाबत सूचित करण्यात येते. यावर्षी
१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रचलित पद्धतीनुसार बँकेत हयातीच्या पुस्तकावर सही
करून दाखला देण्याऐवजी केंद्र शासनाच्या ‘डीएलसी कॅम्पेन ५’ अंतर्गत डिजिटल
स्वरूपात हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी
नोव्हेंबर महिनाभर देशव्यापी अभियान चालणार आहे.
त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी आपला वार्षिक
हयातीचा दाखला प्रत्यक्ष कागदपत्रांच्या स्वरूपात सादर न करता डिजिटल लाइफ
सर्टिफिकेट स्वरूपात सादर करावा. यामुळे प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया अधिक
सुलभ होणार आहे.
तरी अकोला जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय
निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी विहित कालावधीत डिजिटल स्वरूपात
हयातीचा दाखला सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार
अधिकारी माधव ब. झुंजारे यांनी केले आहे.
०००



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा