साखर साठ्याची मर्यादा १ हजार क्विंटलपर्यंत
साखर साठ्याची मर्यादा १ हजार क्विंटलपर्यंत
अकोला, दि. ६ : केंद्र शासनाकडून साखर साठा निर्बंधात सुधारणा
करण्यात आली आहे. जिल्ह्यात साखरेच्या व्यावसायिकांनी कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी 1 हजार
क्विंटलपेक्षा जास्त साखर साठा साठवू नये, असे आदेश आहेत.
केंद्र शासनाचे अन्नसाठा देखरेख पोर्टलवर https://foodstock.dfpd.gov.in/ साखर व्यावसायिकांनी तात्काळ नोंदणी करावी. साखर व्यावसायिकांनी शासनाच्या पोर्टलवर साखर साठा माहिती अचूक आणि वेळेवर दिली जाईल याची खात्री करणे
आवश्यक आहे. नमुद पोर्टलवर नोंदणी अयशस्वी होणे, किंवा
पोर्टलवर चुकीची,अपूर्ण, विलंबित
माहिती देणे ही बाब गंभीर मानली जाईल आणि असे व्यावसायिक/संस्थावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 च्या
तरतुदींनुसार कठोर कारवाई सुरू केली जाईल.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आवश्यकतेनुसार साखर खरेदी करावी,
अनावश्यक साखर साठा खरेदी करून साठवणुक करू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा