रब्बी हंगामात कडधान्य लागवडीला प्रोत्साहन ; शेतकऱ्यांना मिळणार १६ किलो मसूर बियाणे मोफत ! महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
रब्बी हंगामात
कडधान्य लागवडीला प्रोत्साहन ;
शेतकऱ्यांना मिळणार
१६ किलो मसूर बियाणे मोफत !
महाडीबीटी पोर्टलवर
ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
अकोला, दि. १३ : दुष्काळाच्या परिस्थितीत
रब्बी हंगामात कमी पाणी लागणाऱ्या कडधान्य पिकांच्या जसे की, हरभरा, तूर, उडीद, मसूर
या पिकांच्या लागवडीला आणि पीक डायव्हर्सिफिकेशनला (पीक फेरपालट) केंद्र व राज्य शासनाकडून
प्रोत्साहन दिले जात आहे. रब्बी हंगामात कडधान्य पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी
कृषी विभागामार्फत मसूर पीक मिनी किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मसूर
पिकाचे १६ किलो वजनाचे बियाणे संच (मिनी किट) पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार
आहे. त्यामुळे रब्बी हंगामात मसूर लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना बियाण्यांवरील
खर्चाची बचत करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत हा
उपक्रम राबविण्यात येत असून, इच्छुक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी
पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी पोर्टलवर उपलब्ध सूचनांनुसार प्रक्रिया
पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.
अर्ज
कसा कराल?
मसूर पीक मिनी किटसाठी अर्ज करण्याकरिता
शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. पोर्टलवर
उपलब्ध सूचनांनुसार आवश्यक माहिती भरावी. तसेच उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करूनही पोर्टलवर
प्रवेश करता येईल.
मसूर
हे महत्त्वाचे कडधान्य
मसूर हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य
पीक आहे. या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन मिळाल्यास कडधान्य उत्पादन वाढविण्यास मदत
होऊ शकते. शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले.
प्रथम
येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
या योजनेंतर्गत बियाणे मिनी किटचे वितरण
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे उपलब्ध
मिनी किटची संख्या लक्षात घेता पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करण्यास विलंब करू नये, असे
आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.
00000




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा