डिजीटल हयात दाखल्याबाबत ‘पेन्शनर्स’साठी सोमवारी कार्यशाळा

 डिजीटल हयात दाखल्याबाबत ‘पेन्शनर्स’साठी सोमवारी कार्यशाळा

अकोला, दि. २१ : निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला डिजीटल स्वरूपात सादर करण्यात अडचणी येत असल्यास त्यांनी सोमवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी ११ वा. जिल्हधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात कार्यशाळेत हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला डिजीटल स्वरूपात दाखल करण्याचे आवाहन जिल्हा कोषागाराने यापूर्वीच केले आहे. त्यानुसार अनेकांकडून डिजीटल दाखले सादर करण्यात आले. तथापि, काही व्यक्तींना दाखला फिजीकला सादर न करता डिजीटल स्वरूपात सादर करण्यात अडचणी येत असतील तर अशा व्यक्तींसाठी सोमवारी मार्गदर्शन करण्यात येईल. संबंधित निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीधारकांनी निवृत्तीवेतनाचे बँक पासबुक, आधारपत्र, तसेच निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधवराव झुंजारे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा