जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद बैठक : ग्राहकांच्या हितासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध -जिल्हा पुरवठा अधिकारी रविंद्र येण्णावार
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद बैठक :
ग्राहकांच्या हितासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध
-जिल्हा पुरवठा अधिकारी रविंद्र येण्णावार
अकोला, दि. 19 : जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण आणि ग्राहक संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने 'जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची' स्थापना करण्यात आली आहे. यानुषंगाने जिल्ह्यातील ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी लेखी स्वरुपात दाखल करावी, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण लवकरण करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रविंद्र येण्णावार यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज संपन्न झाली. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची नवीन कार्यकारीणी सदस्यांची घोषणा यावेळी बैठकीत करण्यात आली.
मागील बैठकीत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा कार्यपूर्ती अहवाल सादर करण्यात आला. तक्रार निवारणा संदर्भात आढावा घेण्यात आला. परिषदेवरील अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या विविध सूचनांची दखल घेऊन, त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या हस्ते जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांना अधिकृत ओळखपत्रांचे वितरण करण्याची मागणी सादर करण्यात आली. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व कालबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा