इंडिया पोस्टतर्फे राष्ट्रीय मसकोट डिझाइन स्पर्धा; नागरिकांना सहभागाचे आवाहन

अकोला, दि. 18 : भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या डाक विभागातर्फे (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट) माय जीओवी या व्यासपीठाद्वारे इंडिया पोस्टच्या अधिकृत मसकोट डिझाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नागरिकांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. इंडिया पोस्टच्या मूल्यांचे, विश्वासार्हतेचे आणि आधुनिक सेवाभिमुख दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करणारा अधिकृत मसकोट तयार करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
प्रस्तावित मसकोटमध्ये विश्वास, सर्वसमावेशकता, डिजिटल सक्षमीकरण, शेवटच्या टप्प्यापर्यंत (लास्ट माईल) सेवा पोहोचविण्याची बांधिलकी तसेच "डाक सेवा जन सेवा" या तत्त्वांचे प्रभावी प्रतिबिंब असावे. याशिवाय इंडिया पोस्टची आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि ग्राहक-केंद्रित संस्था म्हणून ओळख अधिक दृढ करण्याबरोबरच युवक व बालकांमध्ये सर्जनशीलतेला चालना देणे हाही या स्पर्धेचा उद्देश आहे.
स्पर्धकांनी माय जीओवी पोर्टल (www.mygov.in) वर मसकोटचे डिझाइन आणि त्याचे नाव या दोन्ही गोष्टी सादर कराव्यात. सादर करण्यात येणारी प्रवेशिका पूर्णपणे मूळ, सर्जनशील आणि मुद्रित साहित्य, डिजिटल माध्यमे, अॅनिमेशन, मर्चेंडाइज, प्रदर्शने, सोशल मीडिया तसेच विविध अधिकृत प्रचार मोहिमांसाठी उपयुक्त असणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे तयार केलेल्या अथवा साहित्यचौर्य (प्लॅगीराईजम) असलेल्या प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. ही स्पर्धा सर्व वयोगटातील भारतीय नागरिकांसाठी खुली असून प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका सादर करता येणार आहे. सादर केलेल्या मसकोटच्या डिझाइन व नावाचे संपूर्ण मालकी हक्क संबंधित स्पर्धकाकडे असणे आवश्यक आहे.
स्पर्धेचा शुभारंभ झाला असून प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेचा अंतिम निकाल 9 नोव्हेंबर 2026 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मसकोट डिझाइन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 2 लाख 75 हजार व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख 50 हजार व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी 25 हजार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मसकोट नामकरण स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 25 हजार, द्वितीय क्रमांकासाठी 15 हजार आणि तृतीय क्रमांकासाठी 10 हजार तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेत्यांना पारितोषिकाची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वितरित करण्यात येईल. या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपली सर्जनशीलता प्रदर्शित करावी, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.
--

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा