पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्ह्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता

अकोला ,  दि .  २ 8 :  नागपूर येथील  प्रादेशिक हवामान विभागाने अको ला जिल्ह्यात आजपासून  दि . 4  जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्‍याची शक् यता वर्तवली आहे .  यादरम्यान वाऱ्याच्या वेग ताशी  30  ते  40  किमी राहण्याची शक्यता आहे . वीज व  पावसापासून बचावाकरीता सुरक्षि त ठिकाणी आश्रय घेण्‍यात यावा .  अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये .  वीज चमकतांना मोबाईल उपकरणे बंद ठेवावी .  वाहन वीजेच्या खांबापासून दूर ठेवावे .  वीज पडण्याची सूचना मिळविण्यासाठी दामिनी ॲप डाऊनलोड करावे ,  असे आवाहन करण्यात आले आहे .  

मनरेगा ' अंतर्गत शेतात बांबू लागवडीस अनुदान जिल्ह्यात 2 हजार हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट शेतकरी बांधवांनी अर्ज करावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

  अकोला, दि. २७ :  ' मनरेगा ' अंतर्गत शेतात बांबू लागवडीस अनुदान देय असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी अर्ज करावा. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड होण्यासाठी लोक सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.  राज्यातील वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देऊन शाश्वत विकाम साधण्यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीस शेतकऱ्यांना उपयुक्त करून जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणुन बांबूचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स गठित करण्यात आली आहे.  सन 2024-25 या वर्षात अकोला जिल्ह्यात तालुकानिहाय व विभागनिहाय बांबू लागवडीचे 2 हजार हेक्टर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बांबू लागवडी संदर्भात सर्व यंत्रणांना उदिष्ट्ये ठरवून देण्यात आली आहेत.  बांबू लागवडीमध्ये वैयक्तिक बांधावरील बांबू लागवड, सलग लागवड आणि शासकीय जमिनीवर बांबू लागवड करणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांचे शेतामध्ये सलग लागवड करणेकरीता प्रत

जात पडताळणी कार्यालयाच्या वतीने विशेष त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त शाहू महाराज जयंती पर्व

अकोला दि, 27: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाच्यावतीने राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त 26 जून ते 02 जुलै  पर्यंत "राजर्षी शाहु महाराज जयंती पर्व" राबविण्यात येत आहे.26 जुन राजर्षी शाहु महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्याय दिन म्हणुन साजरा करण्यात येते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्यावतीने सामाजिक न्याय दिनानिमीत्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सामाईक परिक्षा 2024 चा निकाल जाहिर झाला आहे. सामाईक परिक्षेनंतर उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. सदर अर्जदार यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याकरीता अर्ज सादर केले नसेल त्यांच्याकरीता "अर्ज स्विकृतीसाठी विशेष खिडकीचे नियोजन" केले आहे. दक्षता पथकातील प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याकरीता दक्षता पथकाचे कॅम्प  01 जुलै 2024 रोजी अकोला समिती कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तसेच विशेष त्रुटी पुर्तता शिबीर दि.03 जून ते 02 जुलै दरम्यान अकोल

छायाचित्र मतदारयादी दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर मतदार नोंदणी कार्यक्रम आढावा बैठक संपन्न

  अकोला, दि 27: 01 जुलै 2024  अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार नविन मतदार नोंदणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, मतदान केंद्राची सद्यस्थिती, मतदार यादीवरील आक्षेप, मतदाराचे स्पष्ट फोटो अपलोड करणे, ईपीक वाटप ई. बाबत दि. 25 जून 2024 पासून कार्यवाही सुरु करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने 31 - अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघामध्ये वास्तव्यास असणाऱ्या व मतदार यादीत अद्याप नाव नोंदणी नसलेले नागरीक 1 जूलै 2024 पूर्वी 18 वर्ष पूर्ण होणारे नवयुवक, महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, विमुक्त भटक्या जाती व जमाती, आदिवासी जमाती, नवविवाहित महिला, ईत्यादी सर्व नागरीकांची मतदार नोंदणी करण्याकरीता जनजागृती करणे व अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने 31 अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी कार्यक्रमाबाबत माहिती देण्याकरीता सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  यांची आढावा सभा  25 जून रोजी पार पडली.यावेळी बिएलओ यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.तर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची सभा दि.26

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज मागविले

अकोला, दि २७ : १३ डिसेंबर २०२३ व दि. ११ मार्च २०२४ नुसार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना २०२४-२५  सत्रापासून कार्यान्वीत करण्यात आली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यायसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या,आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधीत शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा.अशा इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली असून योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत. सविस्तर अटी व शर्ती बाबतचा शासन निर्णय दि. ११ मार्च २०२४ शासनाच्या  www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बँक खात्यांशी आधार क्रमांक संलग्न करून घेण्याचे आवाहन

  अकोला, दि 27: संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान हे महाडीबीटी प्रणालीव्दारे वितरीत करण्याच्या शासनाच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजनेतील सर्व लाभार्थी यांनी आपल्या बँक खात्याशी आपला आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा,असे आवाहन अकोट तहसिलदार यांच्यावतीने करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व पात्र लाभार्थी यांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नसेल तर अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करता येणार नाही, असे आवाहन तहसिलदार डॉ. सुनिल चव्हाण यांनी केले आहे.

सामाजिक न्याय दिनानिमित्त प्रभातफेरी

इमेज
  अकोला, दि. 26 : राजर्षी शाहू महाराज जयंती अर्थात सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातून काढण्यात आलेल्या प्रभातफेरीला समाज कल्याण सहायक आयुक्त एम.डब्ल्यू. मून यांनी हिरवी झेंडी दाखवली. सामाजिक न्यायभवनापासून जेल चौक,अशोक वाटिका चौक,जिल्हाधिकारी कार्यालय,सरकारी बगीचा चौक मार्गे प्रभातफेरीचा समारोप पुन्हा सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला.  यावेळी पंचफुलाबाई पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी,बार्टीचे समतादूत यांच्यासह कर्मचारी सहभागी होते. ०००

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

इमेज
  अकोला, दि. २६ : छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. अधीक्षक शाम धनमने यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. इतर कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ०००

सामाजिक क्रांतीचे अग्रदूत छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिन साजरा

इमेज
  अकोला:आरक्षणाचा हक्क मिळवून देत सामाजिक न्यायाची शिकवण देत क्रांती करणारे राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे जीवन व कार्य प्रत्येकाला प्रेरणा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज चिंचोळकर यांनी व्यक्त केले. ते सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात बोलत होते यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त एम.डब्ल्यू मून,समाज कल्याण विभागाचे सुसतकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज पुढे बोलताना म्हणाले की शाहू,फुले आंबेडकरांचा विचार आज जागतिक पातळीवर पोहोचला आहे.सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू राजांनी केलेले प्रयत्न सामाजिक क्रांतीचा हुंकार होता. कार्यक्रमात अमलीपदार्थ विरोधी दिवसानिम्मित व्यसनमुक्ती शपथ घेण्यात आली. यावेळी श्रीमती पंचफुलाबाई पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, बार्टीचे प्रकल्प अधिकारी समतादूत यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

माना येथे आढळलेल्या जैन मुर्त्यांबाबत आवाहन

अकोला, दि. २६ : माना येथे खोदकामात आढळून आलेल्या जैन धर्मियांच्या पवित्र तीन मुर्त्यांबाबत जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय निखात अधिनियम 1878 च्या कलम पाच अन्वये ही अधिसूचना आज जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, दि.31 मार्च 2023 रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील मौजे माना येथील मातंगपुरा येथे रामेश्वर इंगोले  यांच्या घराच्या आवारात (नझूल भूखंड क्र. 181) पश्चिमेस खुल्या जागेत खोदकामात सांकेतिक चिन्हावरून जैन धर्मियांच्या नेमीनाथ भगवान, संभवनाथ भगवान, महावीर भगवान यांच्या तीन प्रतिमा आढळून आल्या.  या 3 मूर्ती तलाठी यांच्यामार्फत पंचनामा करून माना येथील रामकृष्ण संस्थानचे अध्यक्ष हनुमंतराव बाजीराव देशमुख व सचिव शिवकुमार सुंदरलालजी व्यास यांच्या ताब्यात देऊन त्याबाबतचा सुपूर्दनामा तयार करण्यात आला. या मूर्ती कक्षाची चावी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आली आहे.  सदर मुर्तीबाबत व त्यांचे काही भागाबाबत कोणत्याही व्यक्ती, संस्था यांना व्यक्तीशः अथवा त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत हक्क, दावा, हरकती व इतर बाबी लेखी स्वरुपामध्ये दाखल करावयाचे झाल्यास त्यांनी द

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना

    अनुसूचित जातीतील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना   अकोला, दि. 25 : ‘स्टँड अप इंडिया’मध्ये पात्र ठरलेल्या मात्र, मार्जिन मनी भरण्याची आर्थिक क्षमता नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध स माजाच्या घटकांतील नवउद्यो जकांना 15 टक्क्यांपर्यंत मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधितांनी अर्ज करण्याचे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून यांनी केले आहे. योजनेनुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील   सवलतीस पात्र नवउद्योजक लाभार्थी यां ना प्रकल्प रकमेच्या १० टक्के स्व हि स्सा भरणा केल्यानंतर व कर्ज मंजूर करणा-या बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के फ्रंट एन्ड सबसिडी शासनामार्फत देण्यात येईल. ही योजना ‘स्टँड अप इंडिया’मध्ये   पात्र लाभार्थ्यां साठीच आहे , त्यासाठी संबंधित लाभा र्थ्यांने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे बँकेच्या शिफारशीसह विहित विवरणपत्रात सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे, अर्जासोबत शासन निर्णयानुसार आवश्यक ते सर्व कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.       ०००

‘बार्टी’ मार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; प्रवेश प्रक्रीया सुरु

    ‘बार्टी’ मार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण;   प्रवेश प्रक्रीया सुरु   अकोला, दि. 25 :   अकोला, दि. 25 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना   www.barti.in   या संकेतस्थळावरुन दिलेल्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे दिनांक 3 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार असून ,   विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन ‘बार्टी’चे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीसाठी   सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार केंद्रीय लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण ,   महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षा ,   अभियांत्रिकी सेवा परीक्षा व न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच बँकिंग ( IBPS),   रेल्वे. एलआयसी ,   इ. व तत्सम परीक्षा पूर्व प्रशिक्षण व पोलीस ,   मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण या विवि

शेतक-यांना 90 टक्के अनुदानावर विविध कृषी साधने

  शेतक-यांना 90 टक्के अनुदानावर विविध कृषी साधने अकोला, दि. 25 : जि. प. उपकरातून सर्वसाधारण शेतक-यांसाठी  90 टक्के अनुदानावर कृषी साधने पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेतक-यांनी दि. 10 जुलैपर्यंत पंचायत समितीत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी केले आहे. योजनेनुसार सर्वसाधारण शेतक-यांना 90 टक्के अनुदानावर एचडीपीई पाईप, सोयाबीन स्वच्छ करण्यासाठी स्पायरल सेपरेटर ग्रेडर, प्लास्टिक ताडपत्री 450 जीसीएम, बॅटरी ऑपरेटेड पॉवरस्प्रेअर पंप, सोलर- विद्युत झटका मशिन तार कुंपण आदी साधने पुरविण्यात येतील. त्यासाठी पंचायत समितीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ०००

आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात प्रवेश सुरू

आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात प्रवेश सुरू अकोला, दि. 25 : आदिवासी मुलींच्या व मुलांच्या अकोला येथील शासकीय वसतिगृहात रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.   अकरावी, पदविका, पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. त्यासाठी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरून त्याची प्रिंट व कागदपत्रांच्या प्रती जोडून वसतिगृहात आणून द्यावी. मुलींच्या वसतिगृहाचा पत्ता आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुने क्र. 1, तोष्णीवाल लेआऊट, तसेच आदिवासी मुलींचे वसतिगृह क्र. 2, दामले मार्केट, अकोला असा आहे. मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. 1 हे कृषीनगर येथे व क्र. 2 हे कीर्तीनगर येथे आहे. अर्जासोबत महाविद्यालयात प्रवेश पावती, त्यापूर्वीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, अनुसूचित जात प्रमाणपत्र, 2024-25 चा उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकची प्रत, शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे प्रमाणपत्र, दहावी गुणपत्रिका, आधारपत्र, बँक खाते, आधारपत्र, भ्रमणध्वनी क्रमांक लिंक असल्याचा पुरावा, पासपोर्ट आकारातील छायाचित्र व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे अनि

शेतकरी बांधवांच्या शंकानिरसनासाठी कृषी विभागाचा टोल फ्री कक्ष

  शेतकरी बांधवांच्या शंकानिरसनासाठी कृषी विभागाचा टोल फ्री कक्ष   अकोला, दि. 25 : कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शंका व प्रश्नांचे समर्पक निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी टोल फ्री कक्ष कार्यालयीन कामाच्या दिवशी सुरू आहे. टोल फ्री कक्षामध्ये संपर्कासाठी 1800 233 400 0 हा लॅन्डलाईन व 9822446655 हा मोबईल व्हाट्सअप क्रमांक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. खालीलप्रमाणे शंकांचे निरसन करण्यासाठी शेतकरी बांधव कृषी विभागाशी संपर्क करू शकतात.   v टोल फ्री क्रमांक 1800 233 400 0   ·         संपूर्ण वर्षभर सुरू आहे. ·         खते बियाणे कीटकनाशके यांची खरीप रब्बी हंगामातील किंमत उपलब्धता गुणवत्ता बाबत शंका निरसन करण्यासाठी . ·         कृषी विभागाचे निगडित मृदा संधारण विस्तार सांख्यिकी प्रक्रिया व नियोजन , फलोत्पादन , निविष्ठा व गुणनियंत्रण , कृषी यंत्रीकिकरण   इत्यादी संबंधित शंकांचे निरसन करण्यासाठी.   संबंधित जिल्ह्यांचे कृषी विभागाचे संपर्क क्रमांक कृषी विद्यापीठांचे संपर्क क्रमांक आवश्यकता असल्यास दिले जातात   v टोल फ्री क्रमांक 9822446655   ·    

खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून विविध विकासकामांचे नियोजन नियामक परिषदेची बैठक

इमेज
खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून विविध विकासकामांचे नियोजन नियामक परिषदेची बैठक अकोला, दि. 24 : जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे 8.30 कोटी निधीतून जिल्ह्यात विविध विकासकामांबाबत नियोजन परिषदेच्या बैठकीत आज करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार नितीन देशमुख, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले आदी उपस्थित होते. गौण खनिजाच्या स्वामित्वधन शुल्कापोटी जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडे 21.33 कोटी रू. निधी आहे. त्यापैकी 8.30 कोटींतून विविध विकासकामांचे नियोजन बैठकीत करण्यात आले. त्यानुसार या निधीतून जिल्ह्यात आठ रूग्णवाहिका, सुमारे 8 जि. प. शाळांची दुरूस्ती, वर्गखोल्या, तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरूस्ती आदी विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले. विविध लोकप्रतिनिधींनी यावेळी कामांबाबत सूचना केल्या. निधीतून जिल्ह्यात अधिकाधिक विकासकामे होणे आवश्यक आहे. सर्व लोकप्रतिनिधींचे प्रस्ताव  व सूचना लक्षात घेऊन नियोजन लवकरात लव

जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

  जिल्ह्यात पुढील   चार   दिवस   पावसाची   शक्यता अकोला ,  दि .  २४  :  नागपूर   येथील   प्रादेशिक   हवामान   विभागाने   अकोला   जिल्ह्यात आजपासून   दि .  २८   जूनपर्यंत   विजांच्या कडकडाटासह   पाऊस   पडण्‍याची   शक्‍यता   वर्तवली   आहे .   यादरम्यान वा-याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असेल, अशी अटकळ आहे. वीज   व   पावसापासून   बचावाकरीता   सुरक्षित   ठिकाणी   आश्रय   घेण्‍यात   यावा .  अशा स्थितीत   झाडाखाली   आश्रय   घेऊ   नये .  वीज चमकताना   मोबाईल व वीज उपकरणे बंद ठेवावी. वाहन वीजेच्या खांबापासून दूर ठेवावे. वीज पडण्याची सूचना मिळविण्यासाठी दामिनी ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.             ०००

आयटीआय मुलींची अकोला प्रवेश अर्जाची अंतिम तारीख 30 जून.

  आयटीआय मुलींची अकोला प्रवेश अर्जाची अंतिम तारीख 30 जून. अधिकाधिक विद्यार्थिनींंनी प्रवेश अर्ज दाखल करावे :- प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांचे आवाहन. स्थानिक अकोट बस स्टॅन्ड , मनकर्णा प्लॉट स्थित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची )अकोला येथील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज दाखल करणे तसेच प्रवेश अर्ज निश्चित करणे दिनांक 30 जून पर्यंत नियमित सुरू असणार आहे . तर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी 15 जुलै पासून सुरू होण्याचे प्रस्तावित आहे. आयटीआय मुलींची अकोला येथे समुपदेशन केंद्र सुद्धा कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे. प्रवेश प्रक्रिया तसेच विविध व्यवसाय , प्रवेश अर्ज इत्यादी संदर्भातील इत्यंभूत माहिती या केंद्राद्वारे प्रवेश इच्छुकांना मिळू शकते. तसेच ज्यांना आवश्यक असेल अशांना प्रवेश अर्ज भरण्याची सुद्धा सुविधा संस्थेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 100 टक्के जागा ह्या फक्त महिलांकरिता या संस्थेत राखीव आहेत तेव्हा इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या अधिकाधिक महिलांनी तथा मुलींनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज

हमीभाव योजनेत ज्वारी, मका खरेदीसाठी नोंदणीची मुदत दि. 30 जूनपर्यंत

  हमीभाव योजनेत ज्वारी, मका खरेदीसाठी नोंदणीची मुदत दि. 30 जूनपर्यंत अकोला, दि. 24 : आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमीभावाने ज्वारी, मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत दि. 30 जूनपर्यंत, तर खरेदीची मुदत दि. 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.  भरडधान्यात ज्वारी खरेदीचे 60 हजार क्विंटलचे उद्दिष्ट आहे. अधिकाधिक शेतकरी बांधवांना नोंदणी करता यावी यासाठी आता दि.30 जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येईल. नोंदणीसाठी शेतक-यांनी ज्वारी, मका पिकाची नोंद असलेला चालू वर्षाचा सातबारा, बँक पासबुक, आधारकार्डसह स्वत:  उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा विपणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे. ज्वारीचा हमीभाव प्रति क्विं. 3 हजार 180 रू. व मक्याचा 2 हजार 90 रू. आहे. ०००

मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम पात्र व्यक्तींनी मतदार म्हणून नोंदणी करावी - जिल्हाधिकारी अजित कुंभार

  मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम पात्र व्यक्तींनी मतदार म्हणून नोंदणी करावी - जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 24 -   जिल्ह्यात एक जुलै २०२४ या अर्हता दिनांकावरील मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, या दिनांकास वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या सर्व नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी, कोणताही पात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यापासून वंचित राहू नये,   असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.                         असा आहे कार्यक्रम   निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा   विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यकम जाहीर करण्यात आला आहे. पुनरीक्षण पूर्व उपक्रमात मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांच्याव्‍दारा प्रत्‍यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी दि. 25 जून ते दि. 24 जुलैदरम्यान करण्यात येईल. त्यात मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदार यादी, ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे व आयोगाच्‍या मानकानुसार छायाचित्र प्राप्‍त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, तसेच अस्‍पष्‍ट छायाचित्र बदलणे, केंद्राच्‍य