जिल्ह्यात कलम 36 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

जिल्ह्यात कलम 36 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

अकोला, दि. 15 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने आगामी काळातील सण, उत्सव लक्षात घेता आजपासून (दि. 15 फेब्रुवारी) दि. 26 फेब्रुवारीच्या रात्री बारापर्यंत मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी हा आदेश निर्गमित केला.

त्यानुसार मिरवणूक, उपासनास्थळ व तेथील परिसरात गर्दी व अडथळा होऊ न देणे, मिरवणुकीचे मार्ग निश्चित करणे, वाद्य, ढोलताशे वाजविण्याबाबत नियमांचे पालन करणे, ध्वनीक्षेपकाची विहित मर्यादा राखणे आदींद्वारे सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी कारवाई करण्याचे अधिकार पोलीस उपनिरीक्षक व त्यावरील दर्जाच्या अधिका-यांना देण्यात आले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना