पी.एम. किसान सन्मान निधीच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

 

पी.एम. किसान सन्मान निधीच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन   

 

                अकोला, दि. 27 :  प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत 16  वा  हप्ता व नमो किसान महासन्मान निधीचा  दुसरा व तिस-या हप्त्याचे राज्यातील लाभार्थ्यांना वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  होणार आहे. जिल्ह्यातील कुणीही पात्र व्यक्ती या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.  

पीएम किसान योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांचे  ई-केवायसी,  बँक खाते आधार संलग्न करणे  व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे  या बाबी शासनाने बंधनकारक केलेल्या आहेत. तरी ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न नाही अशा व्यक्तींनी तत्काळ पूर्तता करून घ्यावी. याबाबत कृषी विभागामार्फत मोहिमही राबविण्यात आली; पण अद्यापही अकोला जिल्ह्यात  एकूण तीन हजार 105 व्यक्तींची ई-केवायसी    पाच हजार 336 व्यक्तींचे  बँक खाते आधार संलग्नीकरण  प्रलंबित असल्याचे दिसून येत  आहे. तरी सर्व लाभार्थीनी शासनाने बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता करून घ्यावी. काही अडचण असल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय किवा कृषि सहाय्यकाशी संपर्क करावा, असे आवाहन श्री. किरवे यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ