ग्रा. पं. निवडणुकीसाठी सुधारित मतदार यादी कार्यक्रम

 ग्रा. पं. निवडणुकीसाठी  मतदार यादी कार्यक्रम

अकोलादि. 6 : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार विहित मुदतीत मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यातअसे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तहसीलदारांना दिले आहेत.

            जानेवारी ते जून 2024 या कालावधीत मुदत संपणा-यानवनिर्मित व मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्याने निवडणूक होऊ न शकलेल्या राज्यातील सुमारे हजार 278 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिकतसेच निधनराजीनामाअनर्हता आदी कारणांनी रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

मतदार यादी ग्राह्य धरण्याची तारीख दि. 23 जानेवारी 2024 असून, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवार दि. 14 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. हरकती व सूचना दि. 14 ते 20 फेब्रुवारी दरम्यान दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी शक्रवार दि. 23 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होईल.  या कार्यक्रमानुसार पारंपरिक पद्धतीने मतदार याद्या तयार करण्यात याव्यातअसे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ