औद्योगिक वसाहतीत 42 कोटी निधीतून सुविधा कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन



 औद्योगिक वसाहतीत 42 कोटी निधीतून सुविधा कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

अकोला, दि. 11 :  अकोला येथील औद्योगिक वसाहतीत सुमारे 42 कोटी निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज येथे झाले.

आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्यासह विविध उद्योजक व मान्यवर आदी यावेळी उपस्थित होते.

औद्योगिक क्षेत्र पायाभूत सुविधेअंतर्गत विविध कामांसाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याने मोठा निधी मंजूर करण्यात आला. त्यात फेज 1, 2 व 3 मधील रस्त्यांचे डांबरीकरण, अकोला विकास केंद्र वाहतूक नगर रस्त्याची सुधारणा आदी विविध कामे होणार आहेत. यावेळी पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी उद्योजकांशी संवाद साधला.

०००

 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ