सण-उत्सवांचे 13 दिवस ध्वनीक्षेपक वापरास रात्री 12 वा. पर्यंत मुभा

 

सण-उत्सवांचे 13 दिवस ध्वनीक्षेपक वापरास रात्री 12 वा. पर्यंत मुभा

अकोला दि. 13 : यंदा विविध सण व महत्वाचे 13 दिवस सकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत विहीत मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला आहे.

त्यात शिवजयंती (19 फेब्रुवारी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल), महाराष्ट्र दिन (1 मे), गणपती उत्सव दुसरा दिवस (8 सप्टेंबर), गौरी पूजन (11 सप्टेंबर), गौरीविसर्जन  (12 सप्टेंबर), अनंत चतुर्थी (17 सप्टेंबर), ईद ए मिलाद (16 सप्टेंबर), नवरात्री उत्सव (10 व  11 ऑक्टोबर), दिवाळी (दि. 1 नोव्हेंबर), नाताळ (दि. 25 डिसेंबर), तसेच 31 डिसेंबर या तारखांना रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करता येईल. 

विहित ध्वनी मर्यादा व तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ