संत रोहिदास विकास महामंडळातर्फे ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळा महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार








 संत रोहिदास विकास महामंडळातर्फे ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळा

महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचावा

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 21 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे विविध प्रशिक्षण, तसेच व्यवसाय कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. समाजातील युवक, महिला, तसेच पात्र व्यक्तींनी त्याचा लाभ घेऊन स्वयंविकास साधावा व सर्व गरजू व्यक्तींनाही या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.  

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष, तसेच ‘शासन आपल्या दारी’अंतर्गत ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळा नियोजनभवनात झाली, त्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. महामंडळाचे प्रदेश निरीक्षक गजानन भटकर, अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा, मधुकर वडनेरकर, प्रवीण चोपडे, रामाभाऊ उंबरकर, संज्योती मांगे, एच. जी. आत्राम, नीता अंभोरे, प्रसन्न रत्नपारखी, अरूण हेगडे, वर्षा खोब्रागडे आदी यावेळी उपस्थित होते.

महामंडळातर्फे चर्मकार समाजातील चांभार, ढोर, होलार, मोची आदी घटकांच्या  शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. गरजूंनी या योजनांचा लाभ घेऊन इतरांपर्यंतही त्याची माहिती पोहोचवावी. बाजारपेठेतील संधींचा शोध घेऊन त्यानुरूप प्रशिक्षण व उद्यमशीलता जोपासावी. महामंडळाच्या स्थानिक कार्यालयाच्या मागणीनुसार जागा आदी बाबींसाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिका-यांनी दिली.

विविध मान्यवरांनी या कार्यशाळेत राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. बीजभांडवल योजना व इतर योजनांच्या लाभाचे वितरण यावेळी जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील महिला, युवक, व्यवसाय करण्यास इच्छूक व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

 ०००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ