नवोदय विद्यालयाची शनिवारी निवड परीक्षा

 

नवोदय विद्यालयाची शनिवारी निवड परीक्षा

अकोला, दि. 5 : पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाची निवड परीक्षा जिल्ह्यात दोन केंद्रांवर शनिवारी (दि. 10 फेब्रुवारी) होणार आहे. त्यात इयत्ता नववीसाठी 503 आणि 11 वीसाठी 117 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठीचे प्रवेशपत्र www.cbseitms.nic.in या संकेतस्थळावर लॉग-इन करून प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले आहे. विद्यार्थ्याला ऑनलाईन अर्ज भरताना मिळालेला क्रमांक हा त्यांचा रजिस्ट्रेशन क्रमांक आणि त्याची जन्मतारीख ही पासवर्ड असेल. अधिक माहितीसाठी पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, बाभुळगाव जहाँगीर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ