अकोल्यात शुक्रवारी महिलांसाठी रोजगार मेळावा

 

अकोल्यात शुक्रवारी महिलांसाठी रोजगार मेळावा

अकोला, दि. 14 :  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे रोजगारइच्छूक महिलाभगिनींसाठी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे विशेष पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील धूत इलेक्ट्रिकल्स, अबेल इलेक्ट्रो-सॉफ्ट टेक्नॉलॉजी, पिंपल ट्री वेंचर, टॅलेनसेतू आदी आस्थापना, कंपन्यांतील 284 पदे भरण्यात येणार आहेत.  मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी www.mahaswayam.gov.in वर नोंदणी करावी.  इच्छूक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह मेळावास्थळी  उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले. अधिक माहितीसाठी (०७२४)  २४३३८४९ या दूरध्वनी किंवा ९६६५७७५७७८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

 

 

   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा