यांत्रिकीकरण योजनेचा अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा - एसएओ शंकर किरवे

 

यांत्रिकीकरण योजनेचा अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा

-         एसएओ शंकर किरवे

 

अकोला, दि. 13 : राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानात यांत्रिकीकरण योजनांसाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

पाईप (HDPE PIPES/PVC PIPES)

वैयक्तिक शेतकरी वापरासाठी पाण्याच्या स्त्रोता पासून शेतापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी पाईप खरेदीवर एचडीपीई पाईप्स ५० मीटर व  पीव्हीसी पाईप्स ३५ मीटर खरेदीवर जास्तीत जास्त रु.१५ हजार किवा ५० टक्के या पैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील यासाठी उपरोल्लेखित केल्याप्रमाणे महाडीबीटी प्रणालीवर या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी अर्ज करणे आवश्यक आहे.

पंपसंच

वैयक्तिक शेतकरी वापरासाठी विहीर /शेततळे पाण्याच्या स्त्रोतातून पाणी उपसा करण्यासाठी विहिरी व शेततळे करिता बसवलेले पंपसंचाला 10 हजार रु  किवा ५० टक्के या पैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील यासाठी उपरोल्लेखित केल्याप्रमाणे महाडीबीटी प्रणालीवर या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी अर्ज करणे आवश्यक आहे.

मनुष्यचलित बीजप्रक्रिया ड्रम किंवा यंत्र

 

       वैयक्तिक शेतकरी  / शेतकरी गटा करिता बीज प्रक्रिया ड्रम किंवा यंत्र अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मनुष्यचलित बीज प्रक्रिया ड्रम किंवा यंत्र खरेदीसाठी 8 हजार रुपये प्रति युनिट किंवा किमतीच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. शेतकरी गटासाठी बीज प्रक्रिया ड्रम किंवा यंत्र या बाबीची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करावयाची असल्याने या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी गटांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

                           घरगुती साठवणूक कोठी

       कडधान्य व पौष्टिक तृणधान्य पिकांसाठी साठवणूक सुविधा निर्माण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. कडधान्य व पौष्टिक तृणधान्य अंतर्गत घरगुती साठवणूक कोठी या बाबीसाठी लाभार्थ्यांचे स्थानिक पातळीवर अर्ज मागविण्यात येत आहेत. या बाबीसाठी एका लाभार्थ्यास 5 क्विंटल मर्यादेपर्यंत साठवणूक कोठीचा लाभ देण्यात येईल. 5 क्विंटल धान्य साठवून कोठीसाठी किमतीच्या 50 टक्के किंवा 2 हजार रुपये मर्यादेत अनुदान अनुज्ञेय आहे. तरी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

 

 

               मनुष्यचलित टोकन यंत्र / मनुष्यचलित सायकलवर चालणारे सिड ड्रील

 

         गळीतधान्य पिकाच्या पेरणीत सुलभता आणण्यासाठी व बियाण्याची बचत करण्याच्या हेतूने मनुष्यचलित टोकन यंत्र  व मनुष्यचलित सायकलवर चालणारे सिड ड्रील यांचा अभियानातंर्गत समावेश करण्यात आला आहे. वैयक्तिक शेतकरी किंवा गट हे याबाबिच्या अनुदानासाठी पात्र राहतील. मनुष्यचलित टोकन यंत्र खरेदीसाठी १० हजार रुपये प्रति यंत्र व मनुष्यचलित सायकलवर चालणारे सिड ड्रील खरेदीसाठी ५ हजार रुपये प्रती यंत्र किंवा किमतीच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. याबाबीची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपभियान (SMAM) मार्गदर्शक सूचनांनुसार करावी. यासाठी उपरोल्लेखित केल्याप्रमाणे महाडीबीटी प्रणालीवर या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी / गटांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

                           छोटे तेलघाणी सयंत्र

 

       राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य) उत्पादित मालाच्या मूल्यवृद्धीसाठी छोटे तेलघाणी सयंत्र याबाबीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. छोटे तेलघानी सयंत्रनासाठी कृषि यांत्रिकीकरण उपभियान (SMAM) अंतर्गत घटक क्र.३ बाबीखाली (कृषि यंत्र औजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य) नमूद केल्या प्रमाणे अ.जा. / अ.ज. / अल्प, अत्यल्प व महिला शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या ६० टक्के किंवा रुपये १ लाख ८० हजार यापैकी जे कमी असेल ते व इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या ५० टक्के किंवा रुपये १ लाख ५० हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार CIPHET, लुधियाना व यासारख्या इतर केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या Mini Oil Mill / Oil Expeller ची उत्पादक निहाय तेल घाना मोडेलला सदरील अनुदान अनुज्ञेय राहील. यासाठी उपरोल्लेखित केल्याप्रमाणे MAHADBT प्रणालीवर या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी / गटांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

०००

 

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ