लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेत 200 व्यक्तींना प्रशिक्षण देणार

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या

नाविन्यपूर्ण योजनेत 200 व्यक्तींना प्रशिक्षण देणार

      अकोला, दि. 29 ; साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटुंबांसाठी नाविन्यपूर्ण योजनेत जिल्ह्यातील 200 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

समाजातील कुटुंबांची सामाजिक,आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत म्हणून 18 ते 50 वर्षांदरम्यान वय असलेल्या व्यक्तींना व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छूक अर्जदारांनी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, आरोग्यनगर चौक, नालंदानगरच्या बोर्डाजवळ, कौलखेड रोड. अकोला येथे अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री..वाय.वाडीवे यांनी केले आहे.

                    अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत), पासपोर्ट साईज फोटो, शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, आधारकार्ड, मतदान कार्ड, शैक्षणिक दाखला, रहिवास प्रमाणपत्र, बँक खात्याचा तपशील आदी माहिती सादर करावी, असे आवाहन त्यांनी केले. दिव्यांगांना पाच टक्के आरक्षणानुसार प्राधान्य मिळेल.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ