ग्रा. पं. निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

 

ग्रा. पं. निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

अकोला, दि. 6 : राज्य निवडणूक आयोगाकडून जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणा-या नवनिर्मित तसेच मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्याने निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

त्यानुसार दि. 7 फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभेची सूचना व दि. 9 फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभा बोलावून आरक्षण सोडत काढण्यात येईल, ग्रामसभेला तहसीलदारांनी प्राधिकृत केलेले अधिकारी उपस्थित राहतील. प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेला जिल्हाधिका-यांकडून दि. 12 फेब्रुवारीला मान्यता दिली जाईल. प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप दि. 13 फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात येईल.

आरक्षण निश्चितीबाबत दि. 13 ते 16 फेब्रुवारीदरम्यान हरकती व सूचना दाखल करता येतील. उपविभागीय अधिका-यांकडून प्राप्त हरकती विचारात घेऊन दि. 21 फेब्रुवारीपर्यंत अभिप्राय दिला जाईल. त्यांचा अभिप्राय विचारात घेऊन जिल्हाधिकारी हे अंतिम अधिसूचनेस दि. 23 फेब्रुवारी रोजी मान्यता देतील व त्यानंतर अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी दिली जाईल.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ