इमाव, विजाप्र, विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा

 

इमाव, विजाप्र, विजाभज प्रवर्गातील

विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा

अकोला, दि. 21 :  इतर मागास व बहुजन कल्याण विभागातर्फे इमाव, विमाप्र, विजाभज प्रवर्गातील 100 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. त्यात प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन विभागाच्या सहायक संचालक डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

र्जाचा नमुना व पात्रतेच्या अटी याचा तपशील सहायक संचालक, इतर मागास व बहुजन कल्याण यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. हे कार्यालय निमवाडी परिसरात दक्षतानगर पोलीस वसाहतीजवळ असून, त्याचा दूरध्वनी क्र. (0724) 2426438 आहे. पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ