ताकवाडा येथे शासकीय वाळू विक्री केंद्राचा शुभारंभ



ताकवाडा येथे शासकीय वाळू विक्री केंद्राचा शुभारंभ

सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वाळू उपलब्ध

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अकोलादि. १० : नवीन वाळू धोरणामुळे या क्षेत्रातील गुन्हेगारीला आळा बसूनसर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वाळू उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज ताकवाडा येथे केले.

मूर्तिजापूर तालुक्यातील ताकवाडा येथे शासकीय वाळू विक्री केंद्राचा शुभारंभतसेच

लाखपुरी येथील श्री लक्षेश्वर संस्थानाचे २ कोटी रू. निधीतून सभागृह व सौंदर्यीकरण कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते. आमदार हरिश पिंपळेआमदार रणधीर सावरकरआमदार वसंत खंडेलवालजिल्हाधिकारी अजित कुंभार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले कीवाळू तस्करी संपवण्यासाठी व जनसामान्यांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी नवे वाळू धोरण उपयुक्त ठरत आहे.  हे धोरण अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असूनत्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना लवकरच अमलात येतील.  शहरातील बांधकामांमध्ये 'क्रश सँड'चा वापर वाढविण्यावर भर असल्याचेही त्यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्रे ही आपला मानबिंदूअस्मिता व अधिष्ठान आहेत. लाखपूरी ही संतांची भूमी आहे. लाखपुरी या भूमीचे महात्म्य लक्षात घेऊन घाटासाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईलअशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ