गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेसाठी अशासकीय संस्थांकडून प्रस्ताव मागविले

 

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेसाठी

अशासकीय संस्थांकडून प्रस्ताव मागविले

अकोला, दि. 7 : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत जलसाठ्यातून गाळ काढण्याचे काम अशासकीय संस्थेच्या माध्यमातून केले जाते. यावर्षी अशा कामांसाठी इच्छूक अशासकीय संस्थांनी दि. 12 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन अभियानाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सचिन वानरे यांनी केले आहे.

प्रस्तावासाठी निकषांनुसार, संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्रासह तीन वर्षांचे ऑडिट केलेली कागदपत्रे, पुरेसे मनुष्यबळ नेमण्याची क्षमता, यापूर्वी जलसाठे, ग्रामीण विकास, जलसंधारण याबाबत कामाचा अनुभव,संनियंत्रण व मूल्यांकनावर काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत जोडलेल्या दस्तऐवजांची नोंद पान क्रमांकासह अनुक्रमणिकेत असावी. प्रस्ताव सादर करताना कार्यालयात उपस्थित कर्मचा-यांकडून प्रपत्र भरून घ्यावे. अपूर्ण प्रस्तावांची दखल घेतली जाणार नाही.

इच्छूक संस्थांनी दि. 12 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वा. पर्यंत जिल्हा जलसंधारण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी आर. जी. गिरी यांच्याशी 8888430853 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 ०००   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ