पालकमंत्र्यांच्या हस्ते अकोट येथे उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन


 पालकमंत्र्यांच्या हस्ते अकोट येथे  उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

राष्ट्रीय आरोग्य अभियानात अकोट येथे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दि. 10 फेब्रुवारी रोजी  झाले.

परिसरातील रुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा या रुग्णालयाद्वारे प्राप्त होतील. रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल, असे श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आदी यावेळी उपस्थित होते.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा