बालगृहातील मुलांचे प्रतिपालक व्हा - जिल्हाधिका-यांचे नागरिकांना आवाहन

 बालगृहातील मुलांचे प्रतिपालक व्हा

 - जिल्हाधिका-यांचे नागरिकांना आवाहन 

अकोला दि. 28 : बालगृहातील मुलांना कुटुंबाची गरज असते. त्यामुळे अशा मुलांना प्रतिपालकत्व स्वीकारण्यास समाजातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

महिला व बालविकास विभागातर्फे बालगृहातील मुलांसाठी प्रतिपालकत्व योजना (फॉस्टर केअर) योजना राबवली जाते. जिल्हाधिका-यांकडून त्याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. बालकांच्या मुलभुत हक्कांच्या संरक्षणासाठी बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमानुसार कार्यवाही होते. त्यात बालकांचे सर्वोत्तम हित महत्वपुर्ण मानले आहे. कोणतेही लहान मूल हे अनाथ असू नये. प्रत्येक बालकाला परिवार मिळावा यासाठी प्रतिपालकत्व योजना राबवली जाते.

बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमानुसार बालकाला जर जैविक माता- पिता किंवा कोणीही जवळचे नातेवाईक नसतील तर अशा बालकांना प्रतिपालकत्व मिळावे असे नमुद आहे. बालकांचा विकास हा कुटुंबातच चांगल्या प्रकारे होतो. त्यांना आई, वडलांचे प्रेम कुटुंबातच मिळते. अकोला जिल्ह्यात तीन बालगृह व एक शिशुगृह कार्यरत आहे.  काळजी व संरक्षणाची गरज असलेली अनाथ बालके तिथे प्रवेशित आहेत. अशा कुटुंबापासुन वंचित बालकांचे प्रतिपालकत्व स्वीकारण्यास समाजाने पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले.

इच्छुकांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष. द्वारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत पहिला माळा येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ