बिगरमोसमी पाऊस नुकसानाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी पंचनामे पूर्ण करून तत्काळ अहवाल द्यावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार






 बिगरमोसमी पाऊस नुकसानाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

पंचनामे पूर्ण करून तत्काळ अहवाल द्यावा

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 27 : जिल्ह्यात बिगरमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिगरमोसमी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे झालेल्या नुकसानाची जिल्हाधिका-यांनी पाहणी केली. अकोला तालुक्यातील वल्लभनगर, निंभोरा, कासली आदी गावांतील शेतीक्षेत्राची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, इतर अधिकारी व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

जिल्ह्यात बिगरमोसमी काही ठिकाणी गहू, हरबरा, कांदा तसेच इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. त्याची दखल घेऊन जिल्हाधिका-यांनी तत्काळ शेतीक्षेत्रात जाऊन पीक नुकसानाची पाहणी केली, नुकसानाबाबत कृषी, महसूल विभागांनी तत्काळ पंचनामा करून अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक बाबीची काळजीपूर्वक नोंद घ्यावी व कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिका-यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ