नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा २० जानेवारीला

 

नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा २० जानेवारीला

अकोला, दि. २८ :  पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा दि. २० जानेवारी रोजी जिल्ह्यात २५ केंद्रांवर होणार असून, एकूण ७ हजार ४८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षार्थ्यांनी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard या संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रे प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर युजरनेम म्हणून वापरावा. स्वत:ची जन्मतारीख हा पासवर्ड आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी द्विप्रतीत स्वाक्षांकित करून घ्यावे. त्यातील एक प्रत परीक्षा पर्यवेक्षकाला द्यावी लागणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ