शेत रस्त्याबाबतचे वाद मिटविण्यात प्रशासनाला यश जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शेतकऱ्याचे सत्कार





अकोला, दि.१३: बाळापूर महसूल विभागातील काही गावात असणारे शेतकऱ्यांचे शेत रस्त्याबाबतचे वाद नायब तहसीलदार सै. ऐहसानोद्दिन यांच्या पुढाकाराने मिटविण्यात यश आलें आहे. झुरळ खु. उरळ खु.गावाला लागलेले रस्त्याचे ग्रहण तसेच खिरपुरी बु,वाडेगाव येथील अनेक वर्षांपासून शेत रस्त्याबाबत असलेला वाद प्रशासनाच्या पुढाकाराने मिटविण्यात आला असल्याने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

वाडेगाव भाग क्रमांक तीनमधील 'मामोजी वाट' या रस्त्यावरील दोन शेतकऱ्यांच्या बांधावरील असलेल्या झाडांच्या फांद्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करीत असल्याने इतर शेतकऱ्यांना या दोन्ही शेतकऱ्यांनी रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे वाद निर्माण झाला होता त्यामुळे नायब तहसिलदार सैय्यद ऐहसानोद्दीन यांच्या कोर्टात प्रकरण दाखल करण्यात आले होते. नायब तहसीलदार महसूल यांनी सदर रस्त्याचे स्थळ निरीक्षण करीत असताना दोन्ही शेतकऱ्यांना सदर रस्ता मोकळा करण्याबाबत त्या रस्त्यावरून जाणाऱ्या उपस्थित असलेले सर्व शेतकऱ्यांची सभा घेऊन व समजावून आपसात प्रकरण मिटविण्यासाठी सांगण्यात आल्यावरून दोन्ही शेतकऱ्यांनी केलेल्या रस्त्याचा अडथळा त्या शेतकऱ्यांनी स्वतः रस्त्यावरील लहान झाडे व फांद्या तोडून रस्ता मोकळा केला.

सत्कारावेळी नायब तहसीलदार ऐहसानोद्दीन, मंडळ अधिकारी सी.सी. बोळे, तलाठी राम लंगोटे, लोपमुद्रा कोठूळे, नारायण घाटोळ, शेतकरी मनोहर राहणे, गजानन मानकर, शिवलाल लोखंडे, विनोद मानकर, सुनिल मानकर, रामराव मानकर, दत्तात्रय मानकर आदी शेतकरी उपस्थित होते. 
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ