कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीचा आज कोनशिला समारंभ

 

अकोला, दि. ८ : येथील कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्या, शनिवारी (दि. ९ डिसेंबर) दु. ३.३० वाजता होणार आहे.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या सन्माननीय उपस्थितीत आणि न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ होणार आहे. न्यायमूर्ती संजय मेहरे, न्यायमूर्ती यनशिवराज खोब्रागडे, न्यायमूर्ती अभय वाघवासे, प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अद्वैत क्षीरसागर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अकोल्यात रेल्वेस्थानक रस्त्यावरील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीची प्रस्तावित जागा आहे.  विविध मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती निमंत्रक न्यायाधीश शुभदा ठाकरे व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रवीण तायडे यांनी दिली.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ