अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

अकोला, दि. १३ : महाराष्ट्र शासनाने  महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना -2023 राबविण्याचा निर्णय  घेतलेला आहे. दिनांक  1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील  निष्पादित केलेले आणि नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेल्या  दस्तांवरील मुद्रांक शुल्क आणि दंडामध्ये या अभय योजनेत  सवलत देण्यात आलेली आहे.
ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024   आणि 1 फेब्रूवारी 2024 ते 31 मार्च  2024 या दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.
पहिल्या  टप्प्यामध्ये रक्कम भरल्यास  जास्त सवलत देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
 अभय  योजनेचा लाभ घेण्यासाठी  करावयाचा अर्जाचा नमुना व सदर योजनेची सविस्तर माह‍िती   या  विभागाच्या संकेतस्थळावर (igrmaharashtra.gov.in) उपलब्ध आहे.
तसेच सदर योजनेसाठी मुद्रांक जिल्हाधिकारी, अकोला किंवा नजिकच्या सह दुय्यम निबंधक /दुय्यम निबंधक  कार्यालय, अकोला जिल्हा यांचे कार्यालयात अर्ज करता येईल.
तरी अकोला जिल्ह्यातील पक्षकारांनी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना -2023 चा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

00000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ