महिला तक्रार समितीच्या सदस्य निवडीसाठी अर्ज मागविले

 

महिला तक्रार समितीच्या सदस्य निवडीसाठी अर्ज मागविले 

अकोला, दि. २८ : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून जिल्हा स्थानिक तक्रार समिती स्थापण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष व तीन सदस्य निवडीसाठी इच्छूकांकडून दोन प्रतीत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

 अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण किंवा विशिष्ट ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारनिवारणासंबंधी काम केल्याचा पाच वर्षांचा अनुभव असावा. या क्षेत्रात कार्य करणारी महिला, तसेच त्यांना श्रम रोजगार सेवा व फौजदारी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सदस्यपदासाठी महिलांसाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्था, संघटनेत कार्यरत असणे आवश्यक आहे. कायद्याचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.  एका पदासाठी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजातील महिलांतून निवड केली जाणार आहे. 

प्रस्तावासह सामाजिक कार्याचा तपशील, वृत्तपत्रीय कात्रणे, कुठलाही गुन्हा नोंद नसल्याचे पोलीस अधिक्षक कार्यालयाचे चारित्र्य प्रमाणपत्र, जिल्हा दंडाधिका-यांचे विना दुराचार प्रमाणपत्र आदी कागदपत्रे पुढील ३० दिवसांत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिका-यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ