जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

 


अकोला, दि. 8 :  सशस्त्र सेना ध्वजदिन -2023 निधी संकलनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे अध्यक्षतेखाली गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाला.  
              निवासी उपजिल्हाधिकारी व प्र. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, महेश परंडेकर, बळवंत अरखराव, शरद जावळे, अनिता भालेराव, तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या हस्ते निधी संकलनाला सुरूवात करून सर्व उपस्थितांना ध्वज लावण्यात आले.
मागील वर्षी जिल्ह्याला 73 लक्ष 30 हजार रू. चे उद्दिष्ट देण्यात आले होते.  हे उद्दिष्ट 116  टक्क्यांनी पूर्ण झाले. ही समाधानाची बाब असून, पुढील वर्षीही या उद्दिष्टाच्या पुढे जाऊन निधी संकलित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले.  
0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ