निवडणूक निरीक्षक डॉ निधी पांडेय यांनी घेतला मतदार यादी कामाचा आढावा

 

मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघात ११,०४६ नवमतदारांची नोंदणी

अकोला,(जिमाका)दि,१५:  ०१ जानेवारी २०२४ दिनांकावर आधारीत मतदार यादीचे संक्षीप्त पुनरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत ०३२ मूर्तिजापूर मतदार यादी कामाचा आढावा निवडणुक निरीक्षक तथा अमरावती विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय यांनी घेतला.त्यानी आर.जी. राठोड महाविद्यालय मुर्तिजापूर येथे भेट देवून मतदार जनजागृतीबाबत  मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघात जनजागृती करीता तयार करण्यात आलेल्या रथाची पाहणी केली तसेच उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधुन मतदान जनजागृतीच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी मुर्तिजापूर संदिपकुमार अपार,उपजिल्हाधिकारी निवडणुक महेश परांडेकर, तहसिलदार मुर्तिजापूर शिल्पा बोबडे, मुख्याधिकारी न.प. मुर्तिजापूर सुप्रीय टवलारे,आर.जी. राठोड महाविद्यालयाचे सचिव डॉ.अनिल राठोड प्राचार्य डॉ.ए.पी. चर्जन उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक डॉ निधी पांडेय यांनी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयास भेट देवून मतदार यादी कामाचा आढावा घेतला.मतदार नोंदणी बाबत मतदार नोंदणी अधिकारी संदिपकुमार अपार यांनी माहिती दिली.

मतदार यादी संक्षीप्त पुनरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघात आतापर्यतं ११,०४६ नविन मतदारांची नोंदणी झाली तसेच यामध्ये १८ ते १९ वर्ष वयोगटातील ३,४५२ मतदारांची नोंदणी झाल्याबाबत निवडणुक निरीक्षक यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अकोला जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील मतदार नोंदणीच्या कामाची माहिती निवडणुक निरीक्षक यांना दिली.

मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील मतदार यादीचे काम उत्कृष्ट रित्या होत असल्याबाबत त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार (सर्व), पर्यवेक्षक व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचे अभिनंदन केले.

०००००००००००००  




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ