नायलॉनचा मांजा न वापरण्याबाबत जिल्हाधिका-यांचे आवाहन

 

नायलॉनचा मांजा न वापरण्याबाबत जिल्हाधिका-यांचे आवाहन

अकोला, दि. २८ : मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवताना नायलॉनचा मांजा वापरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

पतंगाच्या खेळाचा आनंद घेताना इतरांच्या जीविताला बाधा पोहोचू नये याची काळजी घेणे महत्वाचे आहे. पर्यावरण व पशूपक्ष्यांच्या रक्षणासाठी तसेच सामान्य नागरिकांना नायलॉन मांज्यामुळे इजा व दुखापती टाळण्याच्या दृष्टीने नायलॉन मांजाचा वापर जिल्ह्यात कुठेही होता कामा नये, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

 पर्यावरण संरक्षण कायद्याने नायलॉन मांजाच्या खरेदी-विक्री, साठवणूक व वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसे प्रतिबंधात्मक आदेशही निर्गमित करण्यात येतात. प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाहीही होते. तथापि, सुजाण नागरिक म्हणून नियमांचे पालन आणि अनुसरण प्रत्येकाने करणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन